Pages

Friday, April 1, 2022

मोफत ई-लर्निंग आणि ई-पब्लिशिंग



सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी हिंदूं नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छां.. 

मराठी नववर्षाच्या या शुभ मुहुर्तावर, मराठी भाषेला अधिक समृध्द करण्यासाठी, तसेच मराठी साहित्य सर्व जनमानसात मोफत पोहचवुन निरक्षरतेचे उच्चाटन करण्यासाठी, सुमन विकास प्रतिष्ठान, पुणे तर्फे मोफत शिक्षणाशी संबंधित ई-पुस्तके आणि इतर ई-पुस्तके एकाच ठिकाणी प्रकाशित करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. 

वेबसाईटवर उपलब्ध असलेली मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेतील 10,000 पेक्षा अधिक ई-पुस्तके कोणतीही नाव नोंदणी न करता किंवा वैयक्तिक डेटा सबमिट न करता एका क्लिकवर डाउनलोड करता येतील. 

मोफत ई-लर्निंग आणि ई-पब्लिशिंग मोहिमे अंतर्गत, सर्व साहित्यिक, लेखक, कवी आणि तज्ञ व्यक्ति, त्यांच्या नवीन कथा, कादंबरी, कविता संग्रह, शैक्षणिक अथवा इतर ई-पुस्तके पुर्णपणे मोफत प्रकाशित करू शकतात. तसेच तुमची आधी प्रकाशित केलेली ई-पुस्तके , रिसर्च पेपर्स, स्टडी मटेरियल आणि इतर ईबुक्स देखील वेबसाईटवर पुर्णपणे मोफत प्रकाशित करता येतील. 

अधिक माहितीसाठी https://jai-bharat.in/marathi_ebooks.php या वेबसाइटला भेट द्या.

No comments: